“Repo Rate, RLLR आणि MCLR म्हणजे काय?

Total
0
Shares

“Repo Rate, RLLR आणि MCLR म्हणजे काय?”

“होम लोनसाठी RLLR की MCLR? कोणता व्याजदर सर्वाधिक फायदेशीर आहे?”

जर बँक तुमचं होम लोन MCLR वरून RLLR (Repo Linked Lending Rate) मध्ये convert करत नसेल तर कायदेशीर मार्ग काय??

👉 MCLR आणि RLLR यात काय फरक आहे? आणि कोणता दर ग्राहकाला फायदेशीर आहे?

या लेखामध्ये आपण हे सर्व मुद्दे अगदी सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत.


RBI Repo Rate म्हणजे काय?

➡️ बँक RBI कडून कर्ज घेते, आणि त्यावर जो व्याजदर असतो त्यालाच रेपो रेट म्हणतात.

🔹 Repo Rate चे परिणाम:

Repo Rate वाढल्यास:

  • त्यामुळे बँक आपले कर्जाचे दर (उदा. होम लोनचे व्याज) वाढवते.

Repo Rate कमी झाल्यास:

  • बँका कर्ज स्वस्तात देतात (होम लोनसुद्धा).
    • ग्राहकाला ह्याचा खूप फायदा होतो.

🏦 होम लोनसाठी RLLR की MCLR – कोणता व्याजदर अधिक फायदेशीर?


👉 MCLR आणि RLLR यात काय फरक आहे? आणि कोणता दर फायदेशीर आहे?


🔷 MCLR म्हणजे काय?

MCLR म्हणजे Marginal Cost of Funds Based Lending Rate.
हा दर बँका त्यांच्या अंतर्गत खर्च, ठेवीवरील व्याज, ऑपरेशनचा खर्च यावर ठरवतात.

उदा: जर 1 वर्षाचा MCLR 6.50% असेल आणि बँकेचा Spread 2% असेल,
तर तुमचं Home Loan चा व्याजदर = 8.50% होईल.

महत्वाचा मुद्दा असा कि  MCLR दर वर्षातून फक्त एकदाच बदलतो.

त्यामुळे RBI ने repo rate कमी केला तरी लगेच EMI कमी होत नाही.


🔷 RLLR म्हणजे काय?

RLLR म्हणजे Repo Linked Lending Rate.
हा दर RBI च्या Repo Rate शी थेट लिंक असतो.

उदा: जर RBI Repo दर 6.50% आणि Spread 2.00% असेल,
तर तुमचं व्याजदर = 8.50%

RLLR चे फायदे:
✅ पारदर्शक दर
✅ RBI ने दर बदलले की लगेच तुमच्या लोन दरावर परिणाम होतो
✅ EMI लवकरात लवकर कमी होण्याची शक्यता असते, ते बँकेच्या कार्यप्रणालीवर अवलंबून असते काही बँक लगेच कमी करतात तर काही बँक थोड्या महिन्याचा कालावधी घेतात.


📊 RLLR vs MCLR – तुलना

घटकRLLRMCLR
लिंकRBI Repo Rate शीबँकेच्या अंतर्गत गणनेशी
दर बदलण्याचा वेळ1 महिना6-12 महिने
EMI कमी होण्याचा वेगजलद ✅उशिरा ❌
पारदर्शकताजास्त ✅कमी ❌
ग्राहकाला फायदाजास्त ✅मर्यादित ❌

🔎 माझं लोन RLLR वर आहे की MCLR वर – कसं ओळखावं?

  1. Loan Agreement / Sanction Letter मध्ये स्पष्ट उल्लेख केलाला असतो
  2. Net banking / Mobile App वर Loan Details मध्ये “Benchmark” दिलेला असतो
  3. Loan Statement मध्ये लिहिलेलं असतं:
    1. Benchmark: RLLR / MCLR
  4. बँकेत ह्याबद्दल आपण चौकशी करून खात्री करू शकता

सध्याचं लोन MCLR वर असेल तर काय करावं?

जर तुमचं लोन MCLR किंवा Base Rate वर असेल आणि तुम्हाला दर कमी होण्याचा थेट फायदा हवा असेल, तर:

➡️ बँकेत जाऊन RLLR सोबत लोन लिंक करण्याची विनंती करा
➡️ काही बँका ₹1000 ते ₹5000 पर्यंत प्रोसेसिंग फी घेतात, काही ठिकाणी कमी जास्त असू शकते ते बँक नुसार ठरते.
➡️ जर आपण दीर्घकाळाचा विचार केला RLLR सोबत लोन लिंक केले तर खूप फायदा होतो व तसेच EMI मध्ये सुद्धा बचत होते.


काही मुद्दे
RLLR आधारित लोन हे पारदर्शक, त्वरित प्रभावी आणि ग्राहकासाठी फायदेशीर असते
❌ MCLR दरात उशिरा बदल होतो आणि ग्राहकांना कमी फायदा होतो

👉 त्यामुळे नवीन लोन घ्यायचं असल्यास, किंवा जुनं लोन आहे तर RLLR हेच सर्वोत्तम पर्याय आहे. लोन साठी apply करताना बँक अधिकार्याशी ह्याबद्दल पूर्ण माहिती विचारावी व RLLR हा पर्याय निवडावा असे त्यांना सांगा.


जर बँक तुमचं होम लोन MCLR वरून RLLR (Repo Linked Lending Rate) मध्ये convert करायला नकार देत असेल, तर तुम्ही खालील कायदेशीर आणि प्रभावी मार्गांचा वापर करू शकता:


🧑‍⚖️ RBI चे स्पष्ट निर्देश काय आहेत?

RBI च्या दिनांक 04 सप्टेंबर 2019 च्या परिपत्रकानुसार:
बँकांनी सर्व नवीन फ्लोटिंग दराचे रिटेल कर्ज (जसे की होम लोन) 1 ऑक्टोबर 2019 पासून बाह्य बेंचमार्कशी लिंक करणे बंधनकारक केले आहे.

📌 याचा अर्थ:

  • नवीन कर्ज RLLR शी लिंक असणं बंधनकारक आहे.
  • जुने MCLR कर्ज असलेल्या ग्राहकांना RLLR मध्ये शिफ्ट होण्याचा पर्याय देणं बँकेस बंधनकारक नसले तरी ग्राहकांनी तशी विनंती केल्यास बँकेने नकार देणे अन्यायकारक ठरू शकते.

📝 RLLR शी लोन जोडण्यासाठी खालील माहिती पुरेशी आहे

🔹 Step 1: बँकेत लेखी विनंती करा

  • एका साध्या अर्जात तुम्ही म्हणू शकता:

“माझं कर्ज सध्या MCLR शी लिंक आहे. मला RLLR वर migrate व्हायचं आहे, कृपया मला यासाठीची प्रक्रिया आणि applicable fees सांगा.”


🔹 बँक उत्तर देत नसेल / नकार देत असेल तर:

a) बँकेच्या Grievance Cell ला तक्रार करा

  • बँकेच्या वेबसाइटवर “Customer Grievance Redressal” विभाग असतो
  • ईमेल / ऑनलाईन तक्रार करा व तक्रारीचा संदर्भ क्रमांक (Reference No.) जतन ठेवा

b) 30 दिवसात उत्तर न मिळाल्यास – RBI मध्ये तक्रार

👉 RBI ची तक्रार यंत्रणा:
➡️ Visit: https://cms.rbi.org.in
➡️ Online complaint दाखल करा
➡️ प्रकार: “Deficiency in Banking Services” > Housing Loan > Floating Rate not converted to External Benchmark”



📌 कायदेशीर बाबतीत काय सांगता येईल?

बँकेचा नकार खालील कारणांमुळे ग्राह्य धरला जाऊ शकत नाही:

  • जर बँकेने MCLR वर आधारित कर्ज दिलं आणि ग्राहकाने विनंती केली तर पारदर्शक दरासाठी पर्याय न देणं Unfair Trade Practice ठरू शकते.
  • ग्राहकांना पर्याय देणं हे “Fair Banking Practice” चं एक भाग आहे.

🧾 मराठीत अर्ज (बँकेला देण्यासाठी नमुना):

प्रति, 

शाखा व्यवस्थापक 

___________ बँक 

_________ शाखा

विषय: माझं होम लोन MCLR वरून RLLR वर रूपांतर करण्याबाबत विनंती

महोदय,

मी आपल्या बँकेतून घेतलेलं माझं होम लोन (Loan A/c No: ___________) सध्या MCLR शी लिंक आहे. 

RBI च्या परिपत्रकानुसार, बाह्य बेंचमार्क (Repo Rate) शी लिंक केलेले कर्ज अधिक पारदर्शक व ग्राहकाभिमुख असल्यामुळे, मी माझं कर्ज RLLR वर रूपांतर करण्याची विनंती करतो.

कृपया त्यासंबंधित प्रक्रिया, आवश्यक फी आणि कालावधी याबाबत लवकरात लवकर माहिती द्यावी.

धन्यवाद.

आपला नम्र, 

[तुमचं नाव] 

[मोबाईल नंबर] 

[ईमेल] 

[दिनांक]

                                                                                        Adv Krishna Vijay Babare
                                                                                        Financial Advisor
Solapur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *